अर्धापूर: अर्धापूर येथे विनापरवाना बियर व विदेशी दारू बाळगल्या प्रकरणी आरोपी विरुद्ध अर्धापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
दिनांक 18 ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या दरम्यान तामसा बायपास रोड अर्धापूर येथे यातील आरोपी गजानन कामाजी साखरे व इतर दोन जण रा.अर्धापुर हे विना परवाना बेकायदेशिररीत्या बियर व विदेशी दारू किंमत 6,960/-रू व मुद्देमालासह मिळून आले. फिर्यादी पोकों विजय रामराव कदम, नेम. पोस्टे अर्धापुर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन अर्धापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी गजानन साखरे व इतर दोन आरोपी विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ घोरपडे, हे करीत आहेत.