जळकापटाचे येथे 111 वर्षानंतर पट भरविण्यात आला आहे. महाराष्ट्रातून अनेक ठिकाणावरून पट शौकीन आपल्या बैलजोडीसह दाखल झाले आहे .उत्तम अशी व्यवस्था आयोजकांनी केली असून ,खेळणीचे ,नाश्त्याचे व शेतकरी यांचे शेतीसाठी लागणारे साहित्याची दुकाने सुद्धा त्या ठिकाणी थाटण्यात आली आहे .अनेक बैल जोड्या धावल्या असून पटाचा आज दुसरा दिवस आहे .29 30 व 31 तारखेपर्यंत पट भरविण्यात येणार आहे. लाखो रुपयांचे बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. हजारोच्या संख्येत नागरिक पट पाहण्यासाठी येत आहे.