अकोट नगरपालिका निवडणुकीतील मतमोजणी उद्या पोपटखेड मार्गावरील ट्रायसेम हॉल येथे सकाळी १० वाजता पासून सुरु होणार आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूकही रविवारी स.६ वाजता पासून संध्याकाळी ६वाजेपर्यंत जुन्या बोर्डी मार्गे वळवण्यात आली आहे तर पोपटखेड कडून येणारी वाहतूक ही मोहाळा फाटा आंबोडा अकोलखेड अकोली जहागीर अंजनगाव मार्गाने वळवण्यात आल्याने मार्गावरील वाहनधारकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा आवाहन करण्यात आले असून ह्या मार्गावरील वाहतूक वळवण्याचा आदेश बजावण्यात आले.