नागपूर शहर: एका रात्रीत ५ घरफोड्या करणाऱ्याला २४ तासांत अटक रसूल शेख पोलीस उपनिरीक्षक
तहसील पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रसूल शेख यांनी 16 जूनला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार,तहसील पोलिसांनी एका रात्रीत ५ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या आदित्य उर्फ दिल्ली विकास बब्बर याला अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी गांजाच्या नशेत असल्याने चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीची एक अॅक्टिव्हा आणि त्याच्या आईकडून १० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले असून, पुढील तपास सुरू आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक रसूल शेख यांनी दिली आहे.