नागपूर शहर: सेमिनरी हिल्स परिसरात शौचालयातून सापांच्या जोडीचे थरारक रेस्क्यू!
नागपूर येथील सेमिनरी हिल्स परिसरातील CPWD क्वार्टरमध्ये दोन विषारी कोब्रा सापांनी शिरकाव केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. 'वाईल्ड ॲनिमल्स अँड नेचर हेल्पिंग सोसायटी'चे अध्यक्ष आणि प्रसिद्ध सर्पमित्र शुभम जी.आर. यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या सापांना सुरक्षितरीत्या जेरबंद केले.टाइप-२ क्वार्टरमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाला दुपारी १ वाजेच्या सुमारास शौचालयातून सापांचा फुत्कार ऐकू आला. तिथे दोन मोठे नाग पाहून कुटुंबाची अक्षरशः गाळण उडाली.