तालुक्यातील डांगरखेड गावामध्ये जय हनुमान क्रीडा मंडळ, डांगरखेड यांच्या वतीने भव्य आदिवासी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव एड महेश गणगणे यांनी उपस्थिती लावली. यावेळी शंकर पट पाहण्याचा आनंद घेत ग्रामस्थांशी संवाद साधला व या पारंपरिक आदिवासी उत्सवाचे कौतुक केले. वेगाचा थरार असणाऱ्या शंकरपट पाहण्यासाठी पंचक्रोशितील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती