लातूर: रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी मुदतवाढ
Latur, Latur | Nov 4, 2025 शासनाने सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०२५-२६ पासून खरीप हंगामापासून लागू केली असून, रब्बी हंगामासाठी ही योजना अधिसूचित मंडळातील अधिसूचित पिकांसाठी उपलब्ध आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पिक पाहणी करणे व फार्मर आयडी अनिवार्य राहणार आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक स्वरूपाची आहे. रब्बी हंगामातील ज्वारी (जिरायत व बागायत) पिकासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ तर गहू (बागायत) व हरभरा पिकासाठी १५ डिसेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली.