महागाव: तालुक्यातील नगरवाडी शेतशिवारात गांजा शेतीवर धाड, ३७ किलो ५०० ग्राम गांजा स्थानिक गुन्हे शाखेने केला जप्त
महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे नगरवाडी शेतशिवारात गांजा अंमली पदार्थांची लागवड केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी धाड टाकून कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर दि. 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान नगरवाडी येथील गजानन नारायण मेटकर यांच्या शेात धाड टाकण्यात आली. तपासादरम्यान शेतातून 31 लहान-मोठी अशी एकूण सदतीस किलो पाचशे ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. जप्त मालाची किंमत सुमारे एक लाख सत्यांशी हजार पाचशे एवढी आहे.