धामणगाव रेल्वे स्थानकावर आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. कुर्ला एक्सप्रेस धामणगाव रेल्वे स्थानकात येत असताना एका अनोळखी युवकाने रेल्वेखाली झोपून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर युवक प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या विरुद्ध बाजूस उभा होता. रेल्वे स्थानकात कुर्ला एक्सप्रेस येत असल्याचे लक्षात येताच त्याने आपला मोबाईल फोन रेल्वे ट्रॅकवर ठेवला व त्यानंतर इंजिनजवळ येऊन ट्रॅकवर झोपून आत्महत्या केली. या घटनेमुळे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली.