नागपूर शहर: नागपुरात ॲल्युमिनियमच्या दुकानात धाडसी चोरी; ३ लाखांची रोकड लंपास, बघा सिसिटीव्ही फुटेज
शहरातील पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका दुकानात मोठी चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्याने दुकानातील तब्बल ३ लाख रुपयांची रोकड पळवून नेली असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चोरीची ही घटना 'शाहीन ॲल्युमिनियम' या दुकानात घडली.