वि. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. बी.एम. पाटील यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनचे फाईल वरील अप. क्र.३५२/२०२५, कलम ७४,७५,७५(२) भान्यास. सहकलम ०८.१२ पोक्सो व सहकलम ३(२) (व्ही.ए.) मधील आरोपी सत्यदेव नामदेव जवंजाळ, वय ४५, वर्ष याने ९ वर्ष वय असणा-या चौथ्या वर्गात शिकणा-या अल्पवयीन मुलीचा ट्युशनवरुन घरी येतांना लैंगिक छळ केल्याचे प्रकरणात दाखल केलेला अर्जदार/आरोपीचा जमानत अर्ज नामंजूर केला आहे. वरील आरोपी या प्रकरणात अकोला कारागृहात बंदीस्त आहे.