यावल: यावल शहरातील बुरुज चौकात मोची वाड्यात सर्वत्र अस्वच्छता, तात्काळ स्वच्छता करण्याच्या शिवसेना शिंदे गटाच्या सूचना
Yawal, Jalgaon | Oct 21, 2025 यावल शहरात तूर मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर बुरुज चौक आहे. येथे दीपावली सारखा सण असताना देखील मोठ्या प्रमाणावर घाण कचरा साचलेला आहे. गटारी भरले आहेत. येथील नागरिकांच्या तक्रारी ऐकून या ठिकाणी पाहणी करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक नितीन सोनार हे दाखल झाले व त्यांनी तातडीने नगरपालिकेला येथे स्वच्छता करण्याच्या सूचना केल्या आहेत.