नागपूर शहर: NCRB अहवाल:गृहमंत्र्याचे शहर गुन्हेगारीत देशात दुसऱ्या क्रमांकावर; कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर चिंता
उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहरात गुन्हेगारीच्या वाढत्या आलेखा मुळे खळबळ उडाली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ने २०२४ चा ताजा अहवाल प्रसिद्ध केला असून, यामध्ये नागपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहरातील एकूण गुन्ह्यांमध्ये घट झाली असली तरी, हत्या, बलात्कार आणि रस्ते अपघातांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.