ठाणे: वाहतूक कोंडीच्या विरोधात मनसे आक्रमक, वाहतूक विभाग कार्यालयाला घेराव घालून विचारला जाब
Thane, Thane | Sep 15, 2025 सध्या ठाणे शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना शाळकरी विद्यार्थ्यांना ॲम्बुलन्स आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांना त्रास सहन करावा लागतो. तसेच अपघाताचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दुसरीकडे वाहतूक विभाग वाहतूक कोंडीवर तोडगा न करता दंड मात्र आकारत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या शिष्टमंडळाने वाहतूक विभाग कार्यालयाला घेराव घालून वाहतूक पोलीस उपायुक्त यांना जाब विचारला.