नागपूर शहर: पाचपावली हद्दीतील ज्वेलर्सच्या दुकानातून बाली चोरणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद
30 जूनला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे पाचपावली हद्दीतील सुजाता नगर येथील विहांत ज्वेलर्स दुकानातून बाली घेण्याच्या बहाण्याने २२.४० ग्राम वजनाच्या तब्बल 38 बाली चोरणारे दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहे. यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे तर दुसऱ्याचा शोध घेणे सुरू आहे. या चोरट्यांनी हात सफाई ने कशाप्रकारे चोरी केली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली असून या घटनेमुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.