लातूर: शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईतील जाचक अटी रद्द करा, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष पटेल यांची मागणी
Latur, Latur | Sep 29, 2025 लातूर :सध्या शेतकरी मरण अवस्थेत दिवस काढत आहेत. पावसामुळे शेतांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचले असून, शेतामध्ये जाण्यासाठी रस्त्यांचीही मोठी अडचण आहे. अशा परिस्थितीत नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांवर लादलेल्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. अन्यथा सरकारला शेतकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागेल असे त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.