वाशिम: फटाका विक्रीची दुकाने खुल्या जागेत व पटांगणात असणे बंधनकारक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
Washim, Washim | Oct 14, 2025 फटाका विक्रीची दुकाने खुल्या जागेत व पटांगणात असणे बंधनकारक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर फटाके रात्री ८ ते १० च्या दरम्यानच फोडण्यास परवानगी वाशिम, दि. १४ ऑक्टोबर (जिमाका) : जिल्हयात ग्रामीण व शहरी भागात दिवाळी उत्सव मोठया आनंदात व उत्साहात साजरा करण्यात येतो. दिवाळी उत्सवादरम्यान जिल्हयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता संयुक्त मुख्य विस्फोटक, नियंत्रक पश्चिम विभाग, नवी मुंबई यांच्या २६ सप्टेंबर २०१८ रोजीच्या निर्देशानुसार फटाक्यांच्या दुकानांचे शेड हे आग प्रत