भारताच्या ब्रिक्स २०२६ अध्यक्षपदांतर्गत नागपुरात ब्रिक्स सदस्य देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. ११ जुलै रोजी होणाऱ्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी ही पूर्वतयारी बैठक असून, यात परिवहन क्षेत्रातील सहकार्य वाढवणे आणि भविष्यातील धोरणांवर चर्चा केली जात आहे.