सेनगाव: राष्ट्रवादी शरद पवार गटाची उद्या महत्त्वपूर्ण बैठक,कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,परमेश्वर इंगोले
शरद पवार गटाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी हिंगोली या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न होणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन हिंगोली या ठिकाणी बैठक संपन्न होणार असुन या बैठकीला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शरद पवार गटाचे प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांनी आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता केले.