अमरावती: महानगरपालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई – श्रीधर नगर व चवरे नगर परिसरातील अवैध मंदिर बांधकाम हटविले
अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व उपायुक्त (प्रशासन) डॉ. मेघना वासनकर यांच्या आदेशान्वये दिनांक १५ सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी ११.३० वाजता ते दुपारी २.३० वाजेपर्यंत झोन क्रमांक ४ (बडनेरा) अंतर्गत अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली.राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत श्रीधर नगर व चवरे नगर परिसरात श्री नामदेव झोंबाडे यांच्या प्लॉटसमोरील रस्त्यावर रहिवाशांनी उभारलेले कोणतेही अधिकृत परवानगी नसलेले अवैध मंदिराचे बांधकाम हटविण्यात आले. ही कारवाई माननीय पोली