नागपूर शहर: गिट्टीखदान पोलिसांची मोठी कारवाई; चोरीचा गुन्हा उघडकीस, २ आरोपींना अटक
8 जुलैला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफर नगर येथील एका नवनिर्माणाधीन इमारतीमधून ७०,००० रुपये किमतीचे पॉलीकॅब कंपनीचे इलेक्ट्रिक वायर चोरीला गेले होते. गिट्टीखदान पोलिसांनी तपास करत रामदेव बाबा टेकडी परिसराबाहेरून संशयास्पदरीत्या जाणाऱ्या शुभम वामन पूसतोडे (वय २५) आणि सुशील उर्फ दादू श्याममरकाम (वय २५) या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे २० किलो जळालेले तार आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.