मोर्शी: बंजारा आरक्षण कृती समिती मोर्शीच्या वतीने, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार यांना निवेदन
आज दिनांक 23 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता, बंजारा आरक्षण कृती समिती मोर्शी तालुका यांचे वतीने उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमारपवार यांना निवेदन देण्यात आले. शेकडो बंजारा बांधवांच्या उपस्थितीत मोर्शी शहरातील जयस्तंभ चौकातून रॅली काढून उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे