वाशिम: जिल्ह्यातील मसला पेन ते पेनबोरी शेत स्त्याची दुरुस्ती करा शेतकऱ्यांची मागणी #Jansamasya
Washim, Washim | Oct 15, 2025 मागील दोन-तीन महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि सततच्या पावसामुळे पैनगंगा नदीला वारंवार महापूर येत आहे. या पुराच्या पाण्याने पेनबोरी ते मसला पेनदरम्यानचा शेत रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. आता पाऊस थांबला असला तरी त्या भागातील रस्ता अद्यापही चिखलमय स्थितीत असून, शेतकऱ्यांची मोठी कसरत सुरू आहे.या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीत सोयाबीन पिकांची काढणी सुरू आहे. मात्र, रस्त्यावर चिखलाचा थर असल्याने शेतात जाणं अवघड झालं आहे. ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि मजूर या तिघांनाही शेता