बोदवड: चिनावल शेत शिवारात शेत विहीर ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला, सावदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
Bodvad, Jalgaon | Sep 16, 2025 चिनावल या गावाच्या शेतशिवारात निखिल पितांबर भारंबे यांचे शेत आहे. या शेताच्या विहिरीत समीर सुराज तडवी वय ३० या तरुणाचा मृतदेह सोमवारी आढळून आला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.