आशिया कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
आशिया कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शनिवारी दुपारी १ च्या सुमारास प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, हे दुर्दैवी आहे. जेव्हा पंतप्रधान मोदी पंतप्रधान नव्हते, तेव्हा त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की आपण पाकिस्तानला त्याच्या भाषेत उत्तर द्यावे आणि अमेरिकेला रडत बसू नये. देशभक्त असलेल्या आणि देशासाठी खूप काही केलेल्या सोनम वांगचुकला अटक करण्यात आली आहे आणि दुसरीकडे, आपण पाकिस्तानसारख्या देशासोबत क्रिकेट खेळत आहोत.