नंदुरबार: आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष, जिल्हा परिषद समोर शासनाचा प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा
आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलनाला बसले आहेत परंतु अद्याप शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. आज संतप्त होत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून निषेध नोंदविला.