आराळा फाट्यानजीक आज सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची धडक होऊन एक व्यक्ती मृत्युमुखी पडला तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये अकोला येथील रहिवासी युवती व एका व्यक्तीचा समावेश आहे.दोघांची नावे माहिती नसून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.