शहरातील अनेक भागांमध्ये जाणवणाऱ्या तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्षाच्या वतीने नागपूर महानगरपालिकेवर जोरदार धडक मोर्चा काढण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून नागपूरकरांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.