भोकरदन: शहरातील प्रतापनगर येथे शिक्षकाच्या घरात जबरी चोरी,शिक्षक सचिन देशमुख यांनी प्रतापनगर येथे दिली प्रसार माध्यमांना माहिती
आज दिनांक 16 जुलै 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन शहरातील प्रताप नगर येथे शिक्षकाच्या घरात 15 जुलै 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जबरी चोरी झाली आहे,यावेळी त्याच्या घराच्या मुख्य दरवाजे तोडून कपाटात ठेवलेले चार तोळे सोने व रोख , 25हजार रुपये असे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे,सदर घटनेची माहिती भोकरदन पोलिसांना मिळतात घटनास्थळी भोकरदन पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या पथकाने येऊन तपास सुरू केला आहे, अशी माहिती शिक्षक सचिन देशमुख यांनी दिली.