आज २८ डिसेंबर रविवार रोजी बडनेरा पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा एकदा खुनाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुनी बस्ती परिसरातील पवार वाडी येथे ही घटना घडल्याचे समजते. या घटनेत कुणाल या युवकाचा मृत्यू झाला असून तो माता फाइल परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. या खुनामागील कारणांचा शोध घेतला जात असून आरोपींचा शोध पोलिसांकडून जोरात सुरू आहे..