आज दिनांक 24 फेब्रुवारी 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील धावडा येथे असलेल्या अजिंठा पर्वतरांगेच्या कुशीत बसलेल्या शिर्डी घाट परिसरामध्ये मुस्लिम समाज बांधवांनी डोंगराच्या कुशीत आपला संपूर्ण परिवाराला सोबत घेत लहान मोठ्यांना सोबत घेऊन पवित्र असलेला रमजान चा रोजा डोंगराच्या कुशीत सोडला आहे, त्यांनी दाखवून दिला आहे ,की खरा मित्र हा माणसाचा निसर्गच आहे, असे म्हणत त्यांनी हा रोजा सोडला असून दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.