साक्री तालुक्यातील भाडणे येथील पांझरा कान सहकारी साखर कारखाना सुरू होणार की नाही, याबाबत गेल्या काही महिन्यांपासून विविध चर्चा रंगत आहेत. कारखाना सुरू करण्याच्या हालचाली अनेकदा आश्वासक पद्धतीने समोर आल्यात. मात्र, प्रत्येक वेळी त्या अर्ध्यावरच थांबल्याने तालुक्यातील जनता, कामगार आणि ऊस उत्पादक शेतकरी संभ्रमात आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कारखान्याचा मुद्दा केवळ राजकारणासाठी वापरला जात आहे की काय अशा चर्चा आता सर्वत्र रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पांझरा कान कारखाना बचा