जालना: माझ्या आमरण उपोषणाकडे प्रशासन व शासन दुर्लक्ष करत आहे, शेतकरी नेते गजानन उगले यांचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर आरोप
Jalna, Jalna | Sep 18, 2026 आज दिनांक 18 सप्टेंबर 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर शेतकरी नेते गजानन उगले यांचे शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे, त्यांच्या उपोषणाचा आजचा 3 दिवस आहे मात्र शासन,प्रशासन त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे, मात्र दोन दिवसात लक्ष दिले नाही तर मी पाणी पिणे सुद्धा बंद करणार आहे, व यांचे परिणाम, शासन, प्रशासन, आमदार, खासदार यांना भोगावे लागतील व मी उपोषण सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.