नागपूर शहर: महिला बचत गटांसाठी सुवर्णसंधी: महाराष्ट्र सरकार पडीत जमिनी देणार लीजवर; मिळणार १ लाखांचे अनुदान: पालकमंत्री
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता महिला बचत गटांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकार महसूल विभागाच्या ताब्यातील पडीत जमिनी ५ वर्षांच्या करारावर (लीज) उपलब्ध करून देणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराचे मोठे साधन उपलब्ध होणार आहे.