नागपूर शहर: नागपूरमध्ये वेल्डिंग करताना दुचाकीला भीषण आग; मोठी दुर्घटना टळली
नागपूरमधील भीम नगर परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका दुचाकीचे फॅब्रिकेशन काम सुरू असताना अचानक ठिणगी उडाल्याने दुचाकीने पेट घेतला. व्हिडिओमध्ये दिसत असल्यानुसार, रस्त्याच्या कडेला एका दुचाकीचे वेल्डिंगचे काम सुरू होते. काम सुरू असतानाच अचानक दुचाकीतून आगीच्या ज्वाला भडकल्या आणि काही क्षणांतच दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते.