अचलपूर: अंजनगाव-परतवाडा रोडवरील येणी पांढरी फाट्याजवळ एसटी बस व क्रुझरचा भीषण अपघात;तिघांचा मृत्यू, सहा गंभीर
अंजनगाव-परतवाडा मार्गावरील येणी पांढरी फाट्याजवळ आज (२५ ऑक्टोबर) दुपारी ३ ते ४ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून काही नागरीक गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अकोट आगाराची एसटी बस (क्र. एमएच ४० वाय ५१३४) परतवाडाहून अकोटकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रूझर (क्र. एमएच १० सीए ९३७१) वाहनाशी समोरासमोर धडक झाली.यामध्ये अनोळखी पुरुषासह तिघांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली.