समुद्रपूर: शासकिय वैद्यकिय महाविद्यालय निर्माणासाठी संघर्ष समितीच्या वतीने १५ जुलैला जाम येथे चक्का जाम आंदोलन
समुद्रपुर:हिंगणघाट विधानसभे करीता मंजुर झालेले शासकीय वैद्यकिय महाविद्यालय जाम येथील महाराष्ट शासनाची कृषी विभागाच्या अखत्यारीत असणारी सर्व्हे नंबर ३२० आराजी २० हेक्टर हे.३२ आर. (५२एकर) जमीनीवर उभे करावे अशी मागणी तालुका वैद्यकिय महाविद्यालय संघर्ष समितीच्या वतीने तहसिलदार व ठाणेदार यांनी करण्यात आली असुन यासाठी १५ जुलैला १२ वाजता जाम चौकात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.