समुद्रपूर: कुरीअर कंटेनरची उभ्या ट्रकाला धडक आग लागून लाखो रुपयांचा माल खाक:दोन जखमी
जाम जवळील घटना
समुद्रपुर तालुक्यातील जाम जवळ हैदराबाद वरून गुडगाव दिल्ली ला कुरीअरच्या विविध वस्तू घेऊन जात असताना कंटेनरने रोडच्या बाजूला उभ्या ट्रकाला धकड दिल्याने कंटेनरला आग लागून कुरीअरच्या वस्तू जळून खाक झाल्या तर या अपघातात चालक अलताफ अली राहणार इलाहाबाद,वाहक दिपक कुमारपाल दोन्ही गंभीर जखमी झाले.जखमींना उपचारासाठी वर्धा येथे हलविण्यात आले आहे.