नागपूर शहर: खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; केंद्र सरकारने तातडीने दरवाढ मागे घ्यावी - अनिल देशमुख
राज्यातील शेतकरी सध्या गंभीर संकटात सापडला असून, एकीकडे सोयाबीनला भाव मिळत नसताना दुसरीकडे खतांच्या किमतीत केलेल्या भरमसाठ वाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खतांच्या किमती २५ टक्क्यांवरून थेट ४५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्या असून, यावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे