रोटरी क्लब ऑफ अकोट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांकडून उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला.रोटरी हॉस्पिटल येथे पार पडलेल्या या शिबिरात ३६ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजास मोठी मदत केली. हेडगेवार रक्तकेंद्र अकोला वैद्यकीय टीम व रोटरी सदस्यांनी योग्य ती काळजी घेत रक्तदात्यांना उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या.रक्तदात्यांच्या या सहभागामुळे विविध रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी मदत होईल,असे रोटरी क्लब ऑफ आॕफ अकोटचे अध्यक्ष रवी पवार यांनी केले.