नागपूर शहर: झाडावरून पडून नागपुरात चालकाचा दुर्दैवी मृत्यू; सिताबर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
घरमालकाच्या बागेतील बेल तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या एका ६६ वर्षीय चालकाचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मोरेश्वर भगवानजी येळणे वय ६६ वर्ष असे मृत व्यक्तीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मोरेश्वर येळणे हे रामदास पेठ येथील रहिवासी अतुल दोषी यांच्याकडे चालक म्हणून काम करत होते. सोमवारी, ११ मे रोजी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास, ते अतुल दोषी यांच्या न्यू रामदासपेठ येथील घराच्या आवारात असलेल्या बेलाच्या झाडावर फळे तोडण्यासाठी चढले होते.