नेवासा: सामाईक शेतीच्या वादातून तिघांना मारहाण
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे सामाईक शेतीमधील वादातून एका ज्येष्ठ नागरिकासह तिघांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सहा आरोपींसह अनोळखी इसमांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी घडली.