पुण्यात फडणवीसांना घेरावाचा प्रयत्न! मोहोळ यांच्या निवासस्थानाबाहेर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात मुंबई-पुण्यात आंदोलन टाळण्याचे आवाहन केले असतानाच, बुधवारी पुण्यात मराठा आंदोलकांच्या एका गटाने मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुण्यातील निवासस्थानी गणपती दर्शनासाठी फडणवीस आले असताना, घराबाहेर जमलेल्या आंदोलकांनी घोषणाबाजी केली आणि मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करत काही आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
🚨 पुण्यात फडणवीसांना घेरावाचा प्रयत्न!
🔥 मोहोळ यांच्या घराबाहेर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी
👮 आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
⚠️ गणपती दर्शनावेळी मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी
#DevendraFadnavis #ManojJarangePatil #MarathaReservation #MarathaAndolan #Pune #PuneNews #MurlidharMohole #MaharashtraNews #MarathaReservationProtest #Ganeshotsav #BreakingNews
Pune City, Pune | Sep 17, 2026