अमरावती: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपवर टीका
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. “जेव्हापासून मोदी व फडणवीस सत्तेवर आले, तेव्हापासून सत्तेचं केंद्रीकरण सुरू झालं. फडणवीस यांना त्यांच्या जॅकेटच्या खिशात सत्ता हवी आहे. सर्व सत्ता एकाच माणसाने उपभोगावी अशी त्यांची भूमिका आहे” असे सपकाळ म्हणाले.