शेतकऱ्यांसाठी मी नेहमी झटत आलेलो असून आज बहादरपूर येथे उपबाजार समितीचे माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्घाटन व धान्य खरेदी केंद्राच्या शुभारंभ करण्यात आला तो दिलेला शब्दपूर्तीचा आनंद आहे. माझे वय 68 आहे अजून किती दिवस असेल हे सांगता येत नाही परंतु शेवटच्या श्वासापर्यंत जी आपणा विषयी बांधीलकी आहे ती जपण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल असे मत डॉ सतीश पाटील यांनी मांडले.