लातूर: मांजरा धरणाचा विसर्ग वाढला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Latur, Latur | Sep 29, 2025 गेल्या काही दिवसांपासून पावसाने मांजरा पाणलोट क्षेत्रात जोर धरला आहे. या सततच्या पावसामुळे मांजरा धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली असून, धरण सुरक्षित ठेवण्यासाठी आज दि. 29 सप्टेंबर रोजी सायं. 6 वाजता गेट क्रमांक 1,2,3,4,5 व 6 (हे 6 गेट) 0.25 मीटरने उचलण्यात आले आहेत. सद्यस्थितीत मांजरा धरणाच्या सांडव्याची 6 वक्रद्वारे (क्र. 1,2,3,4,5 व 6) 1.500 मीटरने चालू असून मांजरा नदीपात्रात 27 हजार 166.80 क्युसेक्स इतका आहे