घनसावंगी: राजाटाकळी येथे विजेच्या करंट लागून शेळीचा मृत्यू; पंचनाम्याची मागणी
घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी शिवारात विजेच्या करंटमुळे एका शेळीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत शेतकरी बाळू अशोक खरात यांची शेळी विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने जागीच मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेमुळे शेतकरी खरात यांचे आर्थिक नुकसान झाले असून परिसरातील नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवारात विद्युत वाहिन्या व विद्युत यंत्रणेची सुरक्षितता तपासण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, संबंधित शेतकऱ्याने महसूल प्रशासन व महावितरण विभ