जालना: 17 गुन्ह्यांतील सव्वा कोटींचा गांजा जाळून नष्ट; 254 किलो 790 ग्रॅम अंमली पदार्थांची कायदेशीर प्रक्रियेनंतर विल्हेवाट
Jalna, Jalna | Jul 10, 2026 जालना पोलीस घटकातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 17 गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला तब्बल 1 कोटी 25 लाख रुपये किमतीचा 254 किलो 790 ग्रॅम गांजा व अन्य अंमली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जाळून नष्ट करण्यात आले. शुक्रवार दि.10 जुलै 2026 रोजी स. 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त अंमली पदार्थ नाश समितीच्या उपस्थितीत पोलीस मुख्यालयाच्या मोकळ्या आवारात ही कारवाई करण्यात आली.जालना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये घोटका जप्त होता.