नागपूर शहर: हुडकेश्वरमध्ये घरफोडी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या; महेश सागडे, पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट तीन चे पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी 13 मे ला सायंकाळी 6:30 ला दिलेल्या माहितीनुसार हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गजानन नगर येथे एका बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेले चांदीचे दागिने आणि आयफोन असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी दिली आहे.