तिरोडा पोलीस ठाणे अंतर्गत ग्राम महालगाव येथे रेतीची अवैधरीत्या वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला. पोलिसांनी 6 लाख 6 हजार चारशे रुपयाचा माल जप्त केला आहे. आरोपी हा विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टर मध्ये रेतीची वाहतूक करीत असताना पोलीस नायक श्रीरामे यांनी त्याला पकडले. तसेच विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टर किंमत 5 लाख रुपये, ट्रॉली किंमत 1 लाख रुपये ,एक ब्रास रेती व रेती भरण्याचे साहित्य असा 6 लाख 6 हजार चारशे रुपये चा माल जप्त केला आहे.